वाघापुर ग्रामपंचायतीत नव्या सरपंचपदी सौ. दिपाली कुंजीर, उपसरपंचपदी सौ. उज्वला ईंदलकर
वाघापुर (ता. पुरंदर): वाघापुर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीत सौ. दिपाली रमेश कुंजीर यांची सरपंचपदी तर सौ. उज्वला अंकुश ईंदलकर यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली.
या दोन्ही नव्या पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गावच्या विकासासाठी सकारात्मक आणि एकात्मिक नेतृत्व लाभले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नव्या नेतृत्वाचे आमदार मा. विजय शिवतारे यांनी अभिनंदन करताना सांगितले, "वाघापुर गावाने महिला नेतृत्वावर विश्वास दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्याकडून नेहमीच सहकार्य असेल."
सत्कार सोहळ्यात गावातील मान्यवर, माजी पदाधिकारी, महिला बचत गट, युवक प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌸 नवीन नेतृत्वास मनःपूर्वक शुभेच्छा!
✍️ नितीन उमाजी चव्हाण
संपादक, जागरूक लोकमत समाचार