भीक मागण्यासाठी 2 वर्षाच्या मुलीला पळवणाऱ्या टोळीला अटक; समाधान वाघमारे यांची मोलाची भूमिका
कात्रज (पुणे) शहरातील भारत विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 वर्षांच्या मुलीला भीक मागण्यासाठी पळवणाऱ्या टोळीला तुळजापुरात अटक करण्यात आली आहे. या कामगिरीत धाराशिव येथील LCB शाखेतील अंमलदार समाधान वाघमारे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
या घटनेबाबत पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व विविध सोशल मीडियावरून समाधान वाघमारे यांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे. अशा पोलिस अधिकाऱ्यांनी समाजात खरंच गर्व वाटावा अशी कामगिरी बजावली आहे.
जय हिंद 🚨❤️
स्रोत : जागरूक लोकमत समाचार डिजिटल मीडिया