जेजुरी येथे धर्मरक्षक अभ्यास वर्ग यशस्वीरीत्या पार पडला
जेजुरी (८ ऑगस्ट २०२५) – विश्व हिंदू परिषद, मुंबई क्षेत्र धर्मप्रसार विभाग आयोजित धर्मरक्षक अभ्यास वर्ग ५ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जेजुरी येथे उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रसंगी अखिल भारतीय केंद्रीय मंत्री श्री. गोविंदजी शेंडे, मुंबई क्षेत्र धर्मप्रसार प्रमुख प्रा. अजयजी निलदावार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री श्री. किशोर चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. शेखरजी वढणे, श्री. राजाभाऊ चौधरी, श्री. शिवहार लहाने, श्री. प्रशांत शहा, BJP नेते माजी आमदार श्री. संजय चंदुकाका जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्मरक्षक अभ्यास वर्गाच्या माध्यमातून युवकांमध्ये संघटन, शिस्त आणि धर्माबद्दल अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील कार्यात सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले.
Tags: जेजुरी, धर्मरक्षक अभ्यास वर्ग, विश्व हिंदू परिषद, हिंदू धर्म, धर्मप्रसार