पुणे प्रतिनिधी – भटक्या समाजातील कै अशोक पवार यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये घडली पैशाअभावी त्यांच्या उपचारात अडथळे आणले गेले असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे
भरती केलेल्या अशोक पवार यांना आयसीयू मधून बाहेर काढण्यात आले त्यांच्या आईने डॉक्टरांच्या पाया पडून आमची माणसं पैसे आणायला गेलीत कुणीतरी मदत करेल पण तुम्ही उपचार थांबवू नका अशी विनंती केली होती मात्र हॉस्पिटल प्रशासनाने ती विनंती फेटाळून लावत उपचार थांबवले
यावेळी अशोक पवार यांना पायऱ्यांवर चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले आणि नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून मागे वृद्ध आई पत्नी आणि नुकतीच जन्मलेली मुलगी आहे
या संतापजनक घटनेविरोधात जय भैरवनाथ सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारती हॉस्पिटलसमोर आंदोलन करण्यात आले
आंदोलनाची ठाम भूमिका
- पैशाअभावी उपचार थांबवणे म्हणजे माणुसकीला काळिमा फासणे
- आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते हे उघड झाले
- मृत्यूबाबत जबाबदारी टाळणाऱ्या प्रशासनाचा निषेध
- अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर पावले उचलण्याची मागणी
या प्रकरणामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गरीब रुग्णांचा जीव केवळ पैशाअभावी जात असल्याची भावना जनतेत व्यक्त होत आहे