![]() |
मुंबई | १५ ऑगस्ट २०२५
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील मंत्रालय, विधानभवन आणि परिसरातील अनेक इमारती तिरंगा रोषणाईने उजळल्या. या प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
मंत्रालय इमारतीवर झळकणारा भगवा, पांढरा आणि हिरवा रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विधानभवनासह इतर शासकीय इमारतींनाही हीच तिरंगी सजावट करण्यात आली होती. नागरिकांनी या रोषणाईचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.
संध्याकाळी झालेल्या या प्रकाशयोजनेला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती लाभली. देशभक्तीपर गाणी, घोषवाक्ये आणि तिरंगा पताका फडकवून वातावरण आणखीनच उत्साही झाले.
✍ संपादक: जागरुक लोकमत समाचार डिजिटल मीडिया