भोर तालुक्यातील वडार समाज बांधवांची जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
जय भैरवनाथ सामाजिक सहकारी संस्थेच्या पाठपुराव्याला यश; समाजात आनंदाचे वातावरण
भोर, ता. २५
भोर तालुक्यातील कुसगाव येथील भटक्या-विमुक्त जाती जमातीतील वडार समाज बांधव अखेर जात प्रमाणपत्र मिळाले आहे. जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने वडार समाजामध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.
या निर्णयासाठी पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी, भोर उपविभागीय अधिकारी मा. खरात साहेब, भोर तहसीलदार मा. नजक साहेब, महसूल तहसीलदार मा. जायगुडे, मंडल अधिकारी वेळू तसेच ग्रामसेवक कुसगाव यांनी विशेष सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव म्हणाले, "भटक्या-विमुक्त समाजातील बांधवांना शासनमान्य हक्क मिळवून देण्यासाठी आमची संस्था नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. आज मिळालेले हे यश समाजाच्या ऐक्याचे फळ आहे."
यावेळी प्रमाणपत्र स्वीकारताना संजय पवार, संदीप लष्करे, राजू लष्करे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादक जागरूक लोकमत समाचार