🌿 स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक उपक्रम 🌿
(प्रतिनिधी) |
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज निवासी वस्तीगृह, ब्राह्मणी येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतील सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अनाथ, निराधार व उपेक्षित समाजघटकातील लहान मुलांना खाऊ वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करून समाजबंधूत्वाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमातील मान्यवर
- एल.सी.बी. विभागातील पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे
- बाबा भाऊ शिंदे
- दयानंद सावंत सर
- अरुणजी चव्हाण
- पिराजी शिंदे
- आर्मी ऑफिसर पवार साहेब
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत राष्ट्रप्रेम व समाजसेवेचे संस्कार दृढ होतात, असे मत व्यक्त केले.