दिघंची (ता. आटपाडी) येथील श्रीनाथ देवस्थानच्या गट क्रमांक १६१३ मधील जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याची तक्रार देवस्थानचे विश्वस्त
यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.डॉ. शिंदे यांच्या मते, ५ ऑगस्ट रोजी बळीराम रणदिवे, संभाजी साठे आणि ताई साठे यांनी जेसीबीच्या साहाय्याने देवस्थानच्या १७ एकर क्षेत्रातील काही भागात अतिक्रमण करून घराच्या बांधकामास सुरुवात केली. सदर जमीन देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून तिची देखरेख करण्यासाठी नियुक्त विश्वस्त आणि प्रशासनिक अधिकारी आहेत.
अतिक्रमणाचे चित्रीकरण करत असताना बळीराम रणदिवे आणि संभाजी साठे यांनी शिवीगाळ करत शारीरिक धाक दाखवला तसेच अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
डॉ. शिंदे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अतिक्रमण थांबवण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत तहसीलदार, मंडल अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच स्वरूपाचे अतिक्रमण झाल्याची आणि त्या वेळी कंपाऊंडसाठी आणलेले साहित्य बळजबरीने नेल्याची नोंद डॉ. शिंदे यांनी केली आहे.