![]() |
बनावट संदेश अलर्ट |
पुणे – सोशल मीडियावर पुन्हा एकदा फसवणुकीचे सत्र सुरु झाले असून, फेसबुकवर अनेक नागरिकांना बनावट (फेक) मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये नोकरी, लॉटरी, बक्षिसे किंवा बँक खात्याच्या अपडेटच्या नावाखाली लिंक पाठवून नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सायबर क्राईम विभागाने सांगितले आहे की, या मेसेजद्वारे लोकांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर केला जातो. काही वेळा पीडितांच्या मित्र-परिवाराला पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवले जातात.
फेक मेसेजची काही उदाहरणे:
- “तुम्ही ₹10 लाखांची लॉटरी जिंकली आहे. त्वरित लिंकवर क्लिक करा.”
- “तुमचे फेसबुक अकाउंट बंद होणार आहे. कृपया लगेच लॉगिन करा.”
- “तुमचे बँक खाते ब्लॉक झाले आहे, KYC अपडेट करा.”
- “तुमचा डेटा आणि फोटो वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तपासा.”
तज्ञांचे म्हणणे आहे की, 'तुमचा डेटा फोटो परवानगी' सारखे मेसेज फसवणूक करणाऱ्यांचा नवीन डाव आहे. असे मेसेज मिळाल्यास कोणतीही परवानगी देऊ नये आणि त्वरित ब्लॉक/रिपोर्ट करावे.
सायबर सुरक्षा तज्ञांनी सांगितले आहे की, असे मेसेज मिळाल्यास स्क्रीनशॉट घेऊन cybercrime.gov.in किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
— रिपोर्ट:जागरुक लोकमत समाचार डिजिटल मीडिया