लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाठेगावातून ज्योत शिरवळमध्ये दाखल; लोकजनशक्ती पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई भोसले यांची उपस्थिती
शिरवळ (ता. खंडाळा):
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाठेगाव येथून काढण्यात आलेली ज्योत शिरवळ येथे मोठ्या उत्साहात दाखल झाली. या प्रसंगी लोकजनशक्ती पार्टीच्या सातारा महिला जिल्हाध्यक्ष प्रियांका ताई भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली.
सार्वजनिक शिवमहोत्सव मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विचारांचा जागर घडवण्याच्या दृष्टीने या ज्योत यात्रेला विशेष महत्त्व आहे. या कार्यक्रमात विविध मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सहसंपादक – मोहन शिंदे