पीएम किसान योजनेचा नवा टप्पा: आतापर्यंत ₹3.75 लाख कोटींचे वाटप
वाराणसी | २ ऑगस्ट २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथून ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण केले. या कार्यक्रमात देशभरातील लाखो शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील 11 कोटींहून अधिक शेतकरी बांधवांना एकूण ₹3.75 लाख कोटींचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. यंदाच्या 20व्या हप्त्यात ₹20,500 कोटी 9.7 कोटी शेतकऱ्यांना दिले गेले.
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ ही योजना छोट्या व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 चा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. हा निधी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जातो.
पंतप्रधान मोदींचे वक्तव्य:
“शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. पीएम किसान योजनेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना थेट लाभ पोहचत आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, त्यांच्या आत्मविश्वासाचे बळ आहे.”
🔍 महत्त्वाची माहिती:
- योजनेचे 20 हप्ते यशस्वीरित्या वितरित
- एकूण लाभार्थी: 11 कोटींपेक्षा अधिक
- एकूण वितरीत निधी: ₹3.75 लाख कोटी
- 20व्या हप्त्याची रक्कम: ₹20,500 कोटी
- नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ: pmkisan.gov.in
📄 Press Release ID: 2151696