जागरुक लोकमत समाचार
पुरंदर (जि. पुणे) | दि. 23 ऑगस्ट 2025
छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती – 1285 हेक्टर जमीन निश्चित
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती; भूमिसंपादन प्रक्रियेला वेग

दीर्घ प्रतिक्षेनंतर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात ठोस पावले उचलली जात आहेत. पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली एकूण 1285 हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे.
गावनिहाय भूमिसंपादन क्षेत्र
गाव | क्षेत्र (हे.आर.) |
---|---|
एकतपूर (१) | 201 |
खानवडी | 266 |
कुंभारवळण | 255 |
मुंजवडी (३) | 71 |
पारगाव | 188 |
उदाचिवाडी | 49 |
वनपुरी | 175 |
महत्वाची माहिती
- संमतीपत्र नोंदणी कालावधी: 25 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर
- नोंदणी ठिकाण 1: उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुरंदर (नवीन प्रशासकीय इमारत)
- नोंदणी ठिकाण 2: उपविभागीय अधिकारी भूमिसंपादन क्र. 1, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
- नोंदणी ठिकाण 3: उपविभागीय अधिकारी भूमिसंपादन क्र. 3, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
प्रकल्पाचा अपेक्षित परिणाम
- पुणे व पश्चिम महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची हवाई सुविधा
- उद्योग, व्यापार व पर्यटन क्षेत्राला नवी चालना
- स्थानिकांसाठी थेट व अप्रत्यक्ष रोजगारसंधी