केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुरंदरमध्ये जल्लोषात स्वागत; सहकारी संस्थांची पाहणी आणि श्रीखंडोबा दर्शन
पुरंदर विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत
पुरंदर (जि. पुणे) – बारामती येथे शासकीय दौऱ्यासाठी जात असताना केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ साहेब यांचे पुरंदर विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि घोषणाबाजीद्वारे मंत्री महोदयांचे स्वागत करत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. मंत्री महोदयांनीही या उत्स्फूर्त स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानले.
या स्वागतप्रसंगी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. शेखर वढणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. साकेत जगताप, सासवड शहराध्यक्ष श्री. आनंद जगताप, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्नेहलताई दगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भिवरी येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पाहणी
या दौऱ्यादरम्यान मा. मुरलीधर मोहोळ साहेब व मा. संजय चंदूकाका जगताप साहेब यांनी भिवरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला भेट दिली. त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला, अडचणी जाणून घेतल्या आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी, सहकार क्षेत्रातील सुधारणा, आणि सहकार्याच्या नव्या योजना यावर उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले.
जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन
यानंतर मा. मोहोळ साहेब व जगताप साहेब यांनी जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतले. मंदिर समितीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. पूजाअर्चा करून महाराष्ट्राच्या सुख, समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली.
दर्शनानंतर त्यांनी जेजुरीतील भाजप पदाधिकाऱ्यांशी विशेष संवाद साधत स्थानिक विकास, कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि पक्षबळकटीकरणाच्या दृष्टीने चर्चा केली.
या संपूर्ण दौऱ्यादरम्यान मंत्री मोहोळ साहेबांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून त्यांनी शासनाच्या विविध योजना आणि सहकार्याबाबत सकारात्मक संवाद साधला.