जागरूक लोकमत समाचार
सासवड नगरपालिकेतील प्रभाग रचनेत बदल; नगरसेवकांची संख्या वाढली
सासवड :
आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सासवड नगरपालिकेच्या प्रभाग रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांनी या बदलांना मान्यता दिली असून, अद्याप कोणतेही आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत.
आतापर्यंत नगरपालिकेत ९ प्रभाग होते, मात्र नव्या रचनेनुसार प्रभागांची संख्या ११ वर नेण्यात आली आहे. यासोबतच नगरसेवकांची संख्या १९ वरून २२ इतकी करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत सदस्यांची संख्या एकावरून तीन इतकी वाढविण्यात आली आहे.
या फेररचनेमुळे शहरातील मतदारसंघांचे स्वरूप बदलणार असून काही भाग नव्या प्रभागात सामील होतील. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून आगामी निवडणूक सासवड शहरासाठी अधिक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.
संपादक – जागरूक लोकमत समाचार