भिवरी (ता. पुरंदर) येथे युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
आज शिवसेना संपर्क कार्यालय, सासवड येथे भिवरी (ता. पुरंदर) येथील युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
युवाशक्तीला संघटित करत, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग मिळावा आणि नेतृत्व विकसित व्हावे, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास पुरंदर-हवेली मतदारसंघाचे आमदार श्री. विजय शिवतारे यांनी विशेष उपस्थिती लावली.
श्री. विजय शिवतारे यांनी सर्व नवनियुक्त युवासैनिकांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनही केले.
संपादक: जागरूक लोकमत समाचार