शिरवळ ग्रामसभेत लोकजनशक्ती पार्टी महिला जिल्हा अध्यक्षा प्रियांकाताई भोसले यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न; भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार – प्रियांकाताईंचा ठाम इशारा
![]() |
मुख्य मुद्दे:
शिरवळ ग्रामसभेत लोकजनशक्ती पार्टी महिला जिल्हा अध्यक्षा प्रियांकाताई भोसले यांना काही कथित पुढाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलीसांच्या उपस्थितीतच प्रियांकाताई संतापाने उफाळून आल्या आणि ठामपणे जनतेसमोरच उत्तर देत कथित पुढाऱ्यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला.
त्यांनी संतप्त शब्दांत म्हटले –
“स्वातंत्र्याला ७८ वर्षे झाली तरी आज महिलांचा आवाज दाबला जातो, हा मोठा अन्याय आहे. मात्र लोकजनशक्ती पार्टी व महिला आघाडी अशा प्रवृत्तीला कडाडून विरोध करणार आहे.”
“१५-१६ वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न होतोय. पण हे पांढऱ्या कपड्यातील कथित चोर आम्ही जनतेसमोर उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही.”
“गावात विकासाचा प्रकाश दिसत नाही म्हणून आम्ही प्रश्न विचारतो. मग गावाचा प्रश्न विचारणारा बाहेरचा कसा ठरेल?”
पोलिसांच्या उपस्थितीतच झालेल्या या थेट आरोप–प्रत्यारोपांमुळे ग्रामसभेचे वातावरण तापले. आगामी निवडणुकीत शिरवळसह साताऱ्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
सहसंपादक – मोहन भिमराव शिंदे जागरूक लोकमत समाचार