भैरव क्रांती सेनेची महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर
पुणे (कामठे पाटील नगर), दि. 28 सप्टेंबर –संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भैरव क्रांती सेनेची महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत गोरगरीब, शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी आणि कलाकार बांधवांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजहितासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करत, शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करत खालील सदस्यांची निवड करण्यात आली आहे:
शंकर जाधव - उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश
संजय भोसले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश
गोविंदराव अटक - उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश
दिपक कुमावत - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश
दिनेश गवळी - सचिव महाराष्ट्र प्रदेश
दिपक पखाले - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश
मोहन निबांळकर - कलाकार समन्वयक महाराष्ट्र प्रदेश
गोपाल ओरसे - सल्लागार महाराष्ट्र प्रदेश
मोहन शिंदे - संघटक महाराष्ट्र प्रदेश
प्रकाश सावंत - समन्वयक महाराष्ट्र प्रदेश
अनिल ओरसे - सल्लागार महाराष्ट्र प्रदेश
जगन्नाथ हादवे - सहसरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश महेश हादवे - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश
सुनील चौगुले - सहसंघटक महाराष्ट्र प्रदेश
नितीन चव्हाण - प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश
अंकुश शेगर -
सहकार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश
दगडु पवार -
समन्वयक महाराष्ट्र प्रदेश
पोपट चौगुले -
सल्लागार महाराष्ट्र प्रदेश
संस्थापक अध्यक्ष विजय जाधव म्हणाले,“शासनाच्या योजना गोरगरीब, शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी व कलाकारांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. भैरव क्रांती सेना समाजहितासाठी सदैव आघाडीवर राहील.”
अलीकडेच जय भैरवनाथ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुण्यात राबविण्यात आलेले जात दाखला अभियान हे भैरव क्रांती सेनेच्या कार्याचा उत्तम नमुना ठरले. शासनाच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिकांना त्यांच्या हक्कांचे दस्तऐवज मिळवून देण्यात आले.
बैठकीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, संघटना राज्यभर जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, राशन कार्ड आणि इतर शासकीय दस्तऐवज मिळवून देण्यासाठी नागरिकांना मदत व मार्गदर्शन करणार आहे.
शासनाच्या योजना अनेक असल्या तरी दस्तऐवजांच्या अडचणींमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. या अडचणी दूर करण्यासाठी भैरव क्रांती सेना राज्यभर ठोस उपक्रम राबविणार आहे.
या निर्णयामुळे हजारो वंचित आणि कष्टकरी बांधवांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. बैठकीतील सर्व ठराव सर्वानुमते मंजूर झाले आणि सदस्यांनी समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.