या बैठकीचे आयोजन आणि पुढाकार जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी घेतला. समाजाच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या विजय जाधव यांच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्रे मिळाल्याने समाजात अपार आनंदाचे वातावरण आहे.
विजय जाधव यांनी सांगितले की, या निर्णयामुळे भटक्या-विमुक्त बांधवांना शासनाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याचवेळी जिल्हाधिकारी साहेबांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यासंदर्भात तातडीने आदेश दिले असून, शासनाच्या सर्व योजना तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतील, यासाठी महसूल विभाग पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
या बैठकीत खालील महत्त्वाच्या योजना आणि कागदपत्रांच्या अटी सोप्या करण्याबाबत चर्चा झाली :
फिरते रेशनिंग कार्ड
विधवा परितक्ता
अंध-अपंगत्व योजना
देवदासी योजना
श्रावण बाळ योजना
आधार कार्ड, उत्पन्न दाखला, जन्म दाखला
घरकुल योजना
कलाकार मानधन व ओळखपत्र योजना