भटक्या विमुक्त जाती-जमातींची महत्वपूर्ण बैठक कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या दालनात संपन्न
भटक्या विमुक्त जाती-जमातींची महत्वपूर्ण बैठक
पुणे प्रतिनिधी :
कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या दालनामध्ये जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव तसेच ओबीसी समाजाचे माजी अध्यक्ष संजय टिळेकर यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जाती-जमातींची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत सर्व समाजाचे समन्वयक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार टिळेकर यांनी भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे कार्य व समाजकारणाचे कौतुक केले तसेच संस्थेच्या कार्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
आमदार टिळेकर म्हणाले की, “आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी असणाऱ्या प्रलंबित योजना तातडीने मिळवून देण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असून मुख्यमंत्री व प्रशासनाच्या मार्फत योग्य त्या उपाययोजना करून न्याय मिळवून देणार आहे.”
या बैठकीत भराडी समाजाचे नेते शंकर जाधव, चित्रकथी समाजाचे नेते संजय भोसले, बेलदार समाजाचे नेते दीपक कुमावत, लोहार समाजाचे नेते दीपक पखाले, मरीआई समाजाचे नेते मोहन निंबाळकर, विलास पवार, दगडू पवार, वासुदेव समाजाचे नेते गोविंदराव अटक, गवळी समाजाचे नेते दिनेश गवळी, वडार समाजाचे नेते वोरसे, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे नेते सागर पवार व अंकुश शेगर, लमान समाजाचे नेते दशरथ माळी, तसेच महिला मान्यवर गजराबाई लगस, गजराबाई बाबर, कविताताई बागल उपस्थित होते.
या बैठकीमुळे विविध समाजातील प्रश्नांवर एकत्रित चर्चा होऊन शासनापर्यंत भटक्या विमुक्त समाजाचा आवाज पोहचवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यात आली.