जागरूक लोकमत समाचार
शिवमल्हार मार्तंड खंडेरायाच्या नगरी जेजुरी येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाला अखेर जात प्रमाणपत्र मिळाले असून हा नगरपरिषद कार्यक्षेत्रातला राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला आहे.
गेल्या कित्येक दशकांपासून हा समाज जेजुरीत वास्तव्य करत असून मार्तंड मल्हारीची सेवा, जागरण-गोंधळाची पारंपरिक कला सादर करत शिवकालीन संस्कृती जपत आहे. मात्र, जात प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून समाज वंचित होता.
जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी या समाजाच्या प्रश्नाची दखल घेतली. पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुड्डी, पुरंदर उपविभागीय अधिकारी मा. वर्षा लांडगे, तहसीलदार राजपूत साहेब, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. इंगवले, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार मा. वाघ, मंडल अधिकारी मा. बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेद्वारे जेजुरीतील नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळाले. या ऐतिहासिक यशामुळे समाजातील बांधवांनी प्रशासन व संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी विलास जगताप, अक्षय शिंदे, अनिल सावंत, शरद शिंदे, सौ. कांताबाई शिंदे, सौ. सानवी शिंदे आदी मान्यवरांनी विशेष सहकार्य केले. आगामी काळात या समाजाच्या रखडलेल्या अनेक योजना शासनामार्फत पूर्ण करण्यासाठी अशाच विशेष मोहिमा राबवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
संपादक-नितीन चव्हाण