विजय जाधव यांचा पुढाकार आणि प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ-मुळशी तालुका भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जात प्रमाणपत्र अभियान यशस्वी
पुणे प्रतिनिधी – मावळ-मुळशीतील भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जात प्रमाणपत्र अभियान यशस्वीरीत्या पार पडले हे अभियान जय भैरवनाथ सामाजिक सहकारी संस्था चे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने आणि मा जिल्हाधिकारी पुणे मावळ-मुळशी चे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले
अभियानाद्वारे मावळ-मुळशीतील शेकडो समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले गेले या कामात प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे, नायब तहसीलदार श्री ढमाले, नायब तहसीलदार श्रीमती दर्शना सूर्यवंशी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वार्ड ऑफिसर श्री ननवरे, गटविकास अधिकारी श्री पंडित, सर्व मंडल अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी सक्रिय सहभाग घेतला
अभियानाचे आयोजन बावधन येथे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या दालनामध्ये करण्यात आले या बैठकीत वासुदेव समाज, वडार समाज, नाथपंथी, डवरी, गोसावी समाज यांचे बांधव उपस्थित होते तसेच युवक, युवती, महिला आणि जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला विशेष योगदान देणारे थेरगावचे मंडल अधिकारी विष्णू भोसले, मंडल अधिकारी श्रीमती अर्पणा अमोल जमदाडे, चाले ग्रामसेविका श्रीमती व्ही बी केदारी, जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे समन्वयक गोविंदराव अटक, वडार समाजाचे पोपटराव चौगुले, डवरी गोसावी समाजाचे दादाराव सावंत, बेलदार समाजाचे नेते दिपकराव कुमावत, गवळी समाजाचे नेते दिनेशराव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते
संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी या यशस्वी अभियानाबद्दल समाधान व्यक्त केले आणि सर्व समाज बांधवांचे सहकार्याबद्दल आभार मानले भविष्यात भटक्या विमुक्त जातीसाठी विविध शासकीय योजना आणि माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आमची संस्था सातत्याने करत राहणार आहे असे विजय जाधव यांनी सांगितले.