महाराष्ट्रात पहिल्यांदाच हवेली तालुक्यातील भटक्या-विमुक्त समाजाला मिळाले फिरते रेशनिंग कार्ड व इतर योजनांचा शासकीय लाभ
भैरव क्रांती सेनेच्या पुढाकाराने हवेली तालुक्यात भव्य शिबिर – शेकडो नागरिकांना शासन योजनांचा लाभ
पुणे प्रतिनिधी | हवेली तालुका :
हवेली तहसीलदार कार्यालय आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त पुढाकारातून येवलेवाडी येथे भटक्या-विमुक्त जाती-जमातींसाठी एक भव्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच येवलेवाडीतील नागरिकांना फिरते रेशनिंग कार्ड देण्यात आले तसेच संजय गांधी निराधार योजना, विधवा योजना, अपंग योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात आला.
या शिबिराचे आयोजन तहसीलदार किरण सुरवसे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरोटे, तसेच कोंढवा मंडळ अधिकारी संदीप शिंदे, कात्रज मंडळ अधिकारी साधना चव्हाण, श्री. संदिप शिंदे (मंडलअधिकारी कोंढवा) श्री.विकास खोटे (तलाठी),श्री.सुधीर गिरमे (तलाठी),श्री.केतन जाधव,(तलाठी),सुनंदा पाटील (मदतनीस) श्री.तानाजी भोई (मदतनीस),राजेंद्र मसुगडे(मदतनीस)
अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी थेट शिबिरस्थळी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे, तसेच योजनांची नोंदणी तात्काळ पूर्ण केली. शिधापत्रिका वाटप, आधार कार्ड व मतदार ओळखपत्र दुरुस्ती, जन्मदाखले, उत्पन्न व रहिवासी दाखले, तसेच आरोग्य व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
या उपक्रमामुळे नागरिकांना दूरवर असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची वेळ व खर्च दोन्ही वाचले. शासनाच्या योजनांचा थेट लाभ स्थानिक पातळीवर मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, हवेली तालुक्यातील हा उपक्रम म्हणजे येवलेवाडी आणि परिसरातील भटक्या-विमुक्त समाजासाठी नव्या युगाची सुरुवात आहे. शासनाच्या सहकार्याने आम्ही समाजातील वंचित घटकांपर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहोत. लवकरच महाराष्ट्रभर अशा शिबिरांचे आयोजन करून भटक्या-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करू. यावेळी भैरव क्रांती सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपाध्यक्ष संजय भोसले प्रदेश उपाध्यक्ष शंकर जाधव प्रदेश उपाध्यक्ष गोविंद अटक प्रदेश सचिव दिनेश गवळी सरचिटणीस दीपक पकाले मार्गदर्शक अनिल शिंदे महिला उपाध्यक्ष समाज प्रेरक सुजाताताई गुरव प्रदेश प्रवक्ते नितीन चव्हाण महिला प्रदेश सचिव कविता बागल महिला समन्वयक प्रिया विक्रम पवार संघटक मोहन शिंदे सुमन सातपुते सागर पवार विक्रम पवार पोपट चौगुले दीपक कुमावत गोपाल ओरसे मोहन निंबाळकर
या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. स्थानिक नागरिक, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत भैरव क्रांती सेनेच्या कार्याची प्रशंसा केली.