कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर साहेब व भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय जाधव यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

कोंढव्यात भैरव क्रांती सेनेची आमदार योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
कोंढवा, पुणे : कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर साहेब यांच्या उपस्थितीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आमदार टिळेकर साहेबांच्या कार्यालयात पार पडली.
या बैठकीत येवलेवाडी येथे भटक्या-विमुक्त समाजासाठी आयोजित शिबिराची माहिती सादर करण्यात आली. आगामी काळात शासनाच्या माध्यमातून समाजाच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि निर्णयांवरही सविस्तर चर्चा झाली.
मा. आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी घरकुल योजना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि शासन लाभ मिळविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे भटक्या-विमुक्त समाजाच्या पुनर्वसनाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान भैरव क्रांती सेनेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यांचा परिचय करून देण्यात आला तसेच त्यांच्या समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
उपस्थित मान्यवर :
प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव अटक, शंकरराव जाधव, सरचिटणीस दीपकराव पकाले, दीपकराव कुमावत, प्रदेश मार्गदर्शक अनिलजी शिंदे, दिनेश गवळी, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता गुरव मॅडम, सचिव बागल मॅडम, मार्गदर्शक सातपुते ताई, तसेच मोहन निंबाळकर, दगडू पवार, विशाल पवार, सचिनराव जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचा समारोप समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार करून करण्यात आला.