गणेश दुर्योधन भोसले यांचे सेवाभाव आणि निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण
भाजप संघटनेतील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून आज गणेश दुर्योधन भोसले हे भाजप पुणे ग्रामीण दक्षिण विभागाचे जिल्हा सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत.
संघटनेत लहानमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी नेहमीच “कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता” अशी ओळख जपली. महिलांसाठी उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे या कामातून त्यांनी समाजाशी थेट नाळ जोडून ठेवली आहे.
लोकांच्या अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढणे हेच त्यांचे खरे बळ ठरले. याच सातत्यपूर्ण सेवाभाव आणि अथक प्रयत्नांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.
या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून, गणेश दुर्योधन भोसले यांचा प्रवास समर्पण, निष्ठा आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.