मा. यशवंत पवार यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड! Solapur Breaking News
मा. यशवंत पवार यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड.
सोलापूर |(प्रतिनिधी)
पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय यशवंत पवार यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन या राज्यस्तरावर अग्रगण्य असलेल्या शासनमान्य ग्राहक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली असून प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर नेहमीच आंदोलने , निदर्शने, निवेदने , तसेच मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार द्वारे पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून पत्रकारांच्या उन्नतीसाठी , भल्यासाठी ,कल्याणासाठी , वारंवार संघर्षाची भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले असून त्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्रभावी संरक्षण कायदा , पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना देऊन , पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना शासनदरबारी घरकुल मिळणेबाबत , पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण , यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती , कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत , राज्यातील यूट्यूब / पोर्टल या मध्यामांना शासकीय जाहिराती व शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची नोंदणी यासह राज्यातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आक्रमकपणे शासन दरबारी नेहमीच लढाई करत असतात.
यशवंत पवार हे ग्राहकांच्या देखील प्रश्नांवर कायम आक्रमकपणे संघर्ष करतील अशी अपेक्षा व्यक्त करत व कार्याची दखल घेऊन ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती, ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे राज्य कार्यवाह विकास महाजन,राज्याचे समन्वय समिती अध्यक्ष सतिश साकोरे,संघटनेचे उपाध्यक्ष रामचंद्र तांबे ,सचिव संतोषबापू मगर ,कोषाध्यक्ष उत्तम झेंडे ,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रविण गव्हाणे ,सिताराम बवले ,अस्लम तांबोळी ,चिंतामणी गिरमकर , ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे सर्व जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र भरातील कार्यकर्ते,
माननीय श्री विकास जगताप भटका विमुक्त संघर्ष समिती अध्यक्ष(ठाणे जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती उपाध्यक्ष)
महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे
भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण
श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)
श्री मोहन शिंदे.सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागरूक लोकमत)
जागरूक लोकमत सातारा प्रतिनिधी मोहिनी लोंढे
जागरूक लोकमत कोल्हापूर प्रतिनिधी स्नेहा डोईफोडे
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.
श्री अधिक श्रीरंग शिंदे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया उपप्रमुख
कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके
श्री नितीन सर्जेराव चव्हाण (कोरेगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख)
यांच्यासह अभिनंदन केलेले आहे. नियुक्ती होताच सन्माननीय यशवंत पवार यांना महाराष्ट्र राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.