मुख्य सामग्रीवर वगळा

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची कामगिरी:मौजे हन्नूर अक्कलकोट येथे चंदन तस्करांच्या आवळल्या मुसक्या! Solapur Gramin Lcb Kamgiri!


        सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची कामगिरी

 प्रतिनिधी- मौजे हन्नूर अक्कलकोट येथे चंदन तस्करांच्या आवळल्या मुसक्या त्यांचेकडून २ लाख ३१ हजार ८00 रू. किंमतीची चंदनाची लाकडे, मोटर सायकलसह इतर साहित्य जप्त मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेतले असताना चंदन चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणूनत्यास प्रतिबंध करून कारवाई करणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोसई शैलेश खेडकर यांचे पथक नेमले होते.

दिनांक २१/११/२०२१ रोजी गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना बातमी मिळाली की, दोन इसम त्यांचेकडील मोटार सायकल नंबर एम एच १३ बीएच ७४६४ वरून चोरलेली चंदनाची लाकडे, व लाकडे तोडण्यासाठी लागणारे साहित्यासह मौजे हन्नुर ता. अक्कलकोट मार्गेइटकळकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदर बातमी प्रमाणे कारवाई करणेकामी अक्कलकोट शहरात हजर असलेले पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथकास कारवाई करणेस सांगितले.

त्याप्रमाणे पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक अक्कलकोट शहरातून निघून मौजे हन्नूर ते इटकळ जाणारे रोडवर काही अंतरावर दबा धरून बसले असताना मौजे हन्नूर गांवाकडून एक मोटार सायकल येत असताना दिसली. त्याचा बातमी प्रमाणे संशय आल्याने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता मोटार सायकल न थांबता तसीच पुढे निघून गेली त्यास पाठलाग करून पकडले. त्यांना पकडल्यानंतर त्यांचे

कब्जातील प्लास्टिकचा पोता व पिशवी तपासून पाहिली असता पोत्यामध्ये सुगंधी चंदनाचे लाकडे व लाकडे तोडण्यासाठी लागणारे ६ लाकडी दांडके, ४ नग लोखंडी गिरमिट, १ लोखंडी कुदळ, १ लोखंडी वाकर्स, १

धार लावण्याकरीता दगड, १ करवत, २ लोखंडी कु-हाडीचे पाते, १ मोटार सायकल असा एकूण२,३१,८०० रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोहेकॉ/ ३८७ धनाजी देविदास गाडे यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरंन ५३६/२०२१ भादविसंक ३७ ९, ३४ प्रमाणे व भारतीय वनअधिनियम १ ९ २७ चे कलम ४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील ०२ आरोपीतांना अटक करून त्यांना मा. न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून रिमांड मुदतीत गुन्हयातील चंदनाची लाकडे विकत घेणारा तिस-या आरोपीस अटक

केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोसई शैलेश खेडकर हे करीत आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, चालक समीर शेख, यांनी बजावली आहे.

संपादक श्री नितीन चव्हाण

सहसंपादक-श्री मोहन शिंदे









या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...