मुख्य सामग्रीवर वगळा

जामखेड नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास होत असल्याने दि.२१व २२ मार्च २०२२ रोजी लेखणी काम बंद आंदोलन - अँड. अरुण (आबा) जाधव यांचा इशारा Jamkhed News

 

जामखेड  नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास होत असल्याने दि.२१व २२ मार्च २०२२ रोजी लेखणी काम बंद आंदोलन - अँड. अरुण (आबा) जाधव यांचा इशारा

”"""""""""""''""'"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

जामखेड  नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास होत  असल्याने लेखणी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जामखेड नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड. अरुण (आबा) जाधव यांनी दिला आहे. मा.मुख्याधिकारी हे त्यांचे जामखेड नगर परिषद कार्यरत कालावधीमध्ये कार्यालयीन कर्मचारी यांना सतत त्रासदायक वागणूक मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडल्या सारखे झाले आहे. कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, जाणीवपूर्वक छळ होत असून ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचून गेले आहे.

    मा.मुख्याधिकारी यांचे रुजू दिनांकापासून ते आज पर्यंत कोणतीही शासकीय सुट्टी अथवा सार्वजनिक सुट्टी (शनिवार, रविवार व इतर सुट्टी) कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. शासनाच्या नियमाच्या व्यतिरिक्त मा. मुख्याधिकारी यांनी कार्यालयीन वेळ ठरवलेली आहे. सकाळी ८:०० ते संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत तसेच २४ तास सतत कामांमध्ये राहून उर्वरित वेळेत कुटुंब असे कामाची पद्धत असूनही कर्मचारी यांनी त्यांचे कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. कर्मचारी हे आजही तन-मन-धनाने सतत कार्यालयात कार्यरत असतात व नेमून दिलेले काम चोख पार पाडतात. नैसर्गिक आपत्ती असो वा covid-19 चे कामकाज असो वा कार्यालयीन अथवा इतर कार्यालयानेही पत्रव्यवहाराद्वारे मागणी केल्यास सदर कार्यालयाचे सर्वेक्षण असो वा कार्यालयीन वसुली असो वा निवडणूक संबंधित कामकाज असो अशी इतर अनेक कामे कर्मचाऱ्यांमार्फत इमानेइतबारे केली जातात. तरीही मा.मुख्याधिकारी कर्मचार्‍यांना वेठीस धरून त्यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारून त्यांना धमकीवजा बोलून सतत कर्मचाऱ्याचा मोठ्याप्रमाणात अपमान केला जातो, ही बाब अधिकाऱ्यास अशोभनीय आहे. कर्मचारी हा सतत बर्डनमध्ये काम करत असून नेहमीच दबाव ताणतणावात राहत आहे. त्यामुळेच काही कर्मचारी मानसिक तणावाच्या संबंधित आजाराच्या ट्रीटमेंट घेत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या हजेर्री मस्टर नुसार कोणत्या कायद्यानुसार शून्य पगार काढण्यात आला  याबाबतचा  लेखी खुलासा सादर करण्यात यावा. 

     मा.मुख्याधिकारी यांचे असे वर्तनामुळे एखाद्या कर्मचार्‍याच्या जीवितास धोका होण्याचा संभव नाकारता येत नाही. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असून मा.मुख्याधिकाऱ्यांमुळे कोणत्याही कर्मचाऱ्यास जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार मुख्याधिकारी साहेब  हे राहतील. तरी याबाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी जामखेड नगरपरिषदेतील सर्व  कर्मचारी यांची काळजीपूर्वक दखल घ्यावी. अथवा वाईट वेळ येईल, यात तिळमात्र शंका नाही. सध्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या आदेशाचे पालन करावे व सदर कामे कोणत्या वेळेत पूर्ण करावेत हा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर उभा राहत असून सर्व कार्मचाऱ्यांच्या मनामध्ये ताण तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

 एका कर्मचाऱ्याकडे जवळपास तीन तीन विभागातील दैनंदिन चार्ज ज्यामध्ये शासनाकडील वेळोवेळी येणारी माहिती/पत्रव्यवहार अशी अनेक कामे जी नगरपरिषद स्थापन झाल्यापासून सुरळीत पार पडत आहेत. कारण कर्मचारी वर्ग स्वतःची जबाबदारी म्हणून कामे करतो. या सर्व कामामध्ये मा.मुख्याधिकारी हे दररोज मिटिंग घेऊन सर्वांसमोर बैठकीमध्ये  व जनतेमध्ये अपमान करणे, त्यांच्यावर कारवाई करणे.तसेच कचरा जर वाऱ्यांनी उडून गेला असेल तर रात्र न दिवस काम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास दंड केला जातो.एक तर तीन तीन महिने पगार होत नाही.अन झाले तर दंडाची रक्कम दोन दोन तीन हजार भरण्यास भाग पाडतात. हा सर्व अमानुष पद्धतीचा छळ  सहन होत नाही.गुलामा सारखी वागणूक दिली जाते.आता हे सर्व असहाय्य झाले आहे. तसेच अरेरावेची भाषा वापरणे,वाटेल तशा खालच्या शब्दात बोलणे, नगरपरिषद ही माझ्या मालकीची असून कर्मचारी वर्ग फक्त मुख्याधिकारी यांचे कामगार आहेत, अशी जाणीव मा. मुख्याधिकारी मार्फत वेळोवेळी केली जाते. कर्मचाऱ्यांना सततचा त्रास, मानसिक छळ, सेवा पुस्तके लाल शाईने लिहिण्याची धमकी, कर्मचाऱ्यांना घरी लावण्याची धमकी, कामावरून काढून टाकण्याची धमकी,१०००/- रुपये दंडाची धमकी, एक दिवसाची पूर्ण पगार कपात करण्याची धमकी, कायम कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळू देणार नाही अशी धमकी,वार्षिक वेतनवाढ रोखण्याची धमकी, कोणत्याही प्रकारचा खुलासा न मागविता व नोटीस न देता कारवाईची धमकी इ. सर्व मा. मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते साहेब यांच्या वर्तनास कर्मचारी वर्ग कंटाळून / वैतागून गेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी लोकशाही पद्धतीने दि.२१व २२ मार्च २०२२ या दोन दिवसात लेखणी काम बंध आंदोलन व दि.२३/०३/२०२२ पासून जोपर्यंत मुख्याधिकारी दंडवते साहेब यांच्यावरती शासकीय पातळीवर सखोल चौकशी करून कारवाई करून बदली होत नाही तो पर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी शासनावरती राहील. तसेच सदर मुख्याधिकारी यांचे मोठ्या पदाचा आहे. या सर्व वागणुकीला सर्व कर्मचारी वर्ग पूर्णपणे खचून गेलेला आहे, असे असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याचा  पगार वेळेवर होत नाही.  तसेच २-३ महिने उशिरा पगार  होत आहे. त्यातही पगारात कपातीचे धोरण नेहमीचेच. आहे  परंतु कपात करूनही पगार नाही. या सर्व बाबींमुळे सर्व कर्मचारी वर्ग पुरता खचून गेलेला आहे व ताण तणावामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती पूर्णपणे संपलेली आहे.

त्यामुळे आम्ही कर्मचारी जोपर्यंत तनाव मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही लेखणीबंदचे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. याबाबत वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन   अँड.डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी केले आहे.

सहसंपादक - मोहन भीमराव शिंदे


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...