मुख्य सामग्रीवर वगळा

कामगार हिताच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन

पुणे प्रतिनिधी :

पुणे जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) यांच्या वतीने केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार कामगार संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस INTUC महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततामय मार्गाने पार पडले. कामगार हिताच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले २९ कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहिता लागू केल्यामुळे कामगारांचे वेतन, नोकरीची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा व संघटन स्वातंत्र्यावर गदा येत असून कामगारांच्या संविधानिक हक्कांना धोका निर्माण झाल्याची तीव्र भावना कामगार वर्गातून व्यक्त करण्यात आली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे जिल्हा INTUC जिल्हाध्यक्ष मा. विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये पुणे शहर अध्यक्ष मा. अग्रवाल साहेब, हिंद कामगार संघटनेचे सुपेकर साहेब तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष दीपक पकाले, उपाध्यक्ष गोविंदराव अटक, सरचिटणीस संग्राम जाधव, खजिनदार पिंकी जाधव, प्रवक्ते नितीन चव्हाण, मोहन शिंदे, संघटक गंगाराम शेगर, दत्ता शिंदे, जिल्हा समन्वयक दगडू पवार, मोहन निंबाळकर, श्री पवार साहेब, संतोष चुकते, सचिन गंगावणे तसेच शेकडो महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

यावेळी केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांचा तीव्र निषेध करण्यात आला. पुणे जिल्हा INTUC कडून पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डूडी साहेब यांना निवेदन देण्यात आले. कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत, रद्द करण्यात आलेले कामगार कायदे पुन्हा लागू करावेत तसेच कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...