मुख्य सामग्रीवर वगळा

उरुळी देवाचीतील इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी जिल्हाधिकारी यांचा कडक इशारा

 


पुणे | दि. १२ फेब्रुवारी २०२६

मौजे उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वे नं. १११, २२१ व २२२/६ या इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे व अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

ही बाब श्री. अमोल अशोक बहुले यांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली. प्राथमिक तपासात शासनाच्या संरक्षित जमिनीवर नियमबाह्य व्यवहार व बांधकाम झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तपास अहवालानुसार—

सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे संकेत,

जमिनीवर अनधिकृत बांधकाम झाल्याची नोंद,

वापर बदलासाठी आवश्यक बिनशेती सारा व ५०% नजराणा शासनाकडे जमा झाला आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसणे—अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

या संदर्भात तहसीलदार, हवेली यांना यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही अहवाल सादर न झाल्याने जिल्हा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी थेट हस्तक्षेप करत दि. १२ फेब्रुवारी २०२६ पूर्वी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, आदेशांचे पालन न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे की—

शासकीय व इनाम जमिनींचे संरक्षण काटेकोरपणे केले जाईल,

जमीन माफिया व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.

या प्रकरणातील कायदेशीर मुद्दे अ‍ॅड. सुरज जाधव यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असून, वेळेची मर्यादा घालून अहवाल सादर करण्याची व शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवावे, अशीही ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.

सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीत राहून पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जागरूक लोकमत मीडिया 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...