मुख्य सामग्रीवर वगळा

गोरगरीब रुग्णांसाठी भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष’चा पुढाकार

पुणे – प्रतिनिधी : कालिदास उबाळे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. निनाद संगिता मल्हारी टेमगिरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत

“भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष” अंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय योजना, पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध खाजगी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते. यामध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत कॉकलियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, अस्थिमज्जा व हात प्रत्यारोपण, हिप व गुडघा बदल, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसीस, कर्करोगासाठी किमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग, नवजात शिशूंचे आजार, बर्न व विद्युत अपघात अशा विविध गंभीर आजारांचा समावेश आहे.

तसेच “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना” अंतर्गत बहुतेक सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध असून, पात्र रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, फोटो, हॉस्पिटल कोटेशन आणि आजाराचे रिपोर्ट ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

पुणे जिल्ह्यातील विविध मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9623988940 / 9850620404

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...