भटक्या विमुक्त जाती-जमातींची महत्वपूर्ण बैठक पुणे प्रतिनिधी : कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या दालनामध्ये जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव तसेच ओबीसी समाजाचे माजी अध्यक्ष संजय टिळेकर यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जाती-जमातींची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व समाजाचे समन्वयक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार टिळेकर यांनी भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे कार्य व समाजकारणाचे कौतुक केले तसेच संस्थेच्या कार्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आमदार टिळेकर म्हणाले की, “आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी असणाऱ्या प्रलंबित योजना तातडीने मिळवून देण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असून मुख्यमंत्री व प्रशासनाच्या मार्फत योग्य त्या उपाययोजना करून न्याय मिळवून देणार आहे.” या बैठकीत भराडी समाजाचे नेते शंकर जाधव, चित्रकथी समाजाचे नेते संजय भोसले, बेलदार समाजाचे नेते दीपक कुमावत, लोहार समाजाचे नेते दीपक पखाले, मरीआई समाजाचे नेते मोहन निंबाळकर, विलास पवार, दगडू पवार, वासुदेव समाजाचे नेते गोविंदरा...
बालगंधर्व रंगमंदिर चौकातील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्व. राजारामबापू पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते जयंतराव पाटील यांचा केलेला अपमान संतापजनक असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केला. या निषेधार्थ पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही घोषणाबाजी करून धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात ॲड. निलेश निकम, किशोर कांबळे, डॉ. सुनील जगताप, डॉ. शशिकांत कदम, रोहन पायगुडे, स्वप्निल जोशी, केतन ओरसे, मनाली भिलारे, विद्या ताकवले, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, तानिया साळुंखे, रमिझ सय्यद, प्राजक्ता जाधव, दिलशाद अत्तार, शैलेंद्र बेल्हेकर, आसिफ शेख आदींसह शहरातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.