शिवनाथ बाबर यांची "जागरूक लोकमत समाचार" मध्ये तालुका प्रतिनिधीपदी नियुक्ती!
दिनांक: 01 ऑगस्ट 2025
ठिकाण: दौंड, पुणे
जागरूक लोकमत समाचार या डिजिटल मीडिया संस्थेच्या वतीने श्री. शिवनाथ गंगाराम बाबर यांची दौंड तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी माध्यम क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली असून, सामाजिक भान व लोकजागृतीची जाण लक्षात घेता त्यांची ही निवड करण्यात आली आहे. संस्थेचे नियम व मूल्ये पाळून, त्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पत्रकारिता क्षेत्रात योगदान देतील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
ओळख क्रमांक: JLSDM-2025-001
कार्यक्षेत्र: दौंड तालुका, पुणे
मुख्य संपादक व संस्थापक: नितीन चव्हाण
(जागरूक लोकमत समाचार)
🎤 माध्यम क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्या शिवनाथ बाबर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!