मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गोरगरीब रुग्णांसाठी भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष’चा पुढाकार

पुणे – प्रतिनिधी : कालिदास उबाळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. निनाद संगिता मल्हारी टेमगिरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे. भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत “भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष” अंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय योजना, पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध खाजगी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते. यामध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत कॉकलियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, अस्थिमज्जा व हात प्रत्यारोपण, हिप व गुडघा बदल, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसीस, कर्करोगासाठी किमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग, नवजात शिशूंचे आजार, बर्न व विद्युत अपघात अशा व...

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन – विष्णुदादा भोसले पुरंदर : पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक वर्ग २ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे १२ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून पीडित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करण्यात आले आहे. ही कारवाई पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून अधिकाराचा गैरवापर करत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून संबंधित अर्जदारास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात...

उरुळी देवाचीतील इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी जिल्हाधिकारी यांचा कडक इशारा

  पुणे | दि. १२ फेब्रुवारी २०२६ मौजे उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वे नं. १११, २२१ व २२२/६ या इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे व अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ही बाब श्री. अमोल अशोक बहुले यांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली. प्राथमिक तपासात शासनाच्या संरक्षित जमिनीवर नियमबाह्य व्यवहार व बांधकाम झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तपास अहवालानुसार— सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे संकेत, जमिनीवर अनधिकृत बांधकाम झाल्याची नोंद, वापर बदलासाठी आवश्यक बिनशेती सारा व ५०% नजराणा शासनाकडे जमा झाला आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसणे—अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या संदर्भात तहसीलदार, हवेली यांना यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही अहवाल सादर न झाल्याने जिल्हा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मा. जिल्हाधि...

कामगार हिताच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन

पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) यांच्या वतीने केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार कामगार संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस INTUC महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततामय मार्गाने पार पडले. कामगार हिताच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले २९ कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहिता लागू केल्यामुळे कामगारांचे वेतन, नोकरीची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा व संघटन स्वातंत्र्यावर गदा येत असून कामगारांच्या संविधानिक हक्कांना धोका निर्माण झाल्याची तीव्र भावना कामगार वर्गातून व्यक्त करण्यात आली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे जिल्हा INTUC जिल्हाध्यक्ष मा. विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये पुणे शहर अध्यक्ष मा. अग्रवाल साहेब, हिंद कामगार संघटनेचे सुपेकर साहेब तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले ...

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय जाधव

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. पुणे : समाजातील गोरगरीब, भटक्या विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भैरव क्रांती सेना संचलित भैरव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांतील भटक्या विमुक्त वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा ठाम निर्धार या संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. भैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, नैतिक मूल्यांची जोपासना तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळावे आणि समाज सक्षम व्हावा, हा या संस्थेच्या कार्यामागील मू...

सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील व भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव सातारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न

  सातारा : सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांच्या उपस्थितीत भटक्या व विमुक्त जाती-जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर भैरव क्रांती सेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव यांनी लोणंद, खंडाळा, कोरेगाव, सातारा, फलटण आणि म्हसवड तालुक्यातील भटक्या-विमुक्त समाजासमोरील अडचणी सविस्तरपणे मांडल्या. विशेषतः घरकुल, जमीन हक्क तसेच महत्त्वपूर्ण शासकीय दस्तऐवज मिळविण्यात येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच, “यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना” जलद आणि सुलभ पद्धतीने राबविण्याची मागणी अध्यक्ष जाधव यांनी केली. या मागणीवर जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांनी तत्काळ प्रतिसाद देत, महसूल विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. या बैठकीस प्रदेश संघटक मोहन शिंदे, प्रदेश सदस्य विक्रम पवार, सातारा महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रिया पवार, सुनील चौगुले, फलटण तालुका अध्यक्ष विकास शिंदे, खंडाळा तालुका अध्यक्ष अविनाश पवार, लोणंद शहराध्यक्ष करण चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष रवी जाधव...

साताऱ्यात धक्कादायक घटना: महिला डॉक्टरची आत्महत्या, PSIसह दोघांवर बलात्कार व छळाचे गंभीर आरोप

  प्रतिनिधि: सातारा जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र खळबळ उडवली आहे. आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले असून या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नोटनुसार, पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने यांनी तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसेच प्रशांत बनकर यांनी काही महिन्यांपासून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे तिने लिहिले आहे. याशिवाय आरोपींकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा घोर आरोपही समोर आला आहे. या क्रूर आणि अमानुष छळामुळेच आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागला, असा दावा हातावर लिहिलेल्या संदेशातून होत आहे. घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत दुजोरा लागला असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. सातारा पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. ही घटना पोलिस यंत्रणेची जबाबदारी, सुरक्षा प्रणालीतील त्रुटी आणि स्त्रीसुरक्षेची चिंता पुन्हा अधोरेखित करते. न्याय मिळण्यासाठी नागरिकांच्या अ...

भैरव क्रांती सेना व संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.

पुणे – सेवा हीच ओळख” या तत्वावर काम करणाऱ्या भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सर्वप्रथम भैरव क्रांती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ओळख करून देण्यात आली, तसेच संघटनेचे सामाजिक कार्य आणि जनतेशी असलेले नाते अधोरेखित करण्यात आले. यानंतर भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली.   या चर्चेसाठी रेणके आयोगाचे माजी केंद्रीय अध्यक्ष श्री. बालकृष्ण रेणके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (VJNT विभाग) अध्यक्षा अ‍ॅड. पल्लवीताई रेणके, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भैरव क्रांती सेना व संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. या शिबिरामध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजना भटक्या-विमुक्त समाजापर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचतील, याबाबत कायदेशीर मार्गदर्शन देण्यात आले. शास...

कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर साहेब व भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय जाधव यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

कोंढव्यात भैरव क्रांती सेनेची आमदार योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न कोंढवा, पुणे : कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर साहेब यांच्या उपस्थितीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आमदार टिळेकर साहेबांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत येवलेवाडी येथे भटक्या-विमुक्त समाजासाठी आयोजित शिबिराची माहिती सादर करण्यात आली. आगामी काळात शासनाच्या माध्यमातून समाजाच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि निर्णयांवरही सविस्तर चर्चा झाली. मा. आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी घरकुल योजना , आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि शासन लाभ मिळविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे भटक्या-विमुक्त समाजाच्या पुनर्वसनाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. बैठकीदरम्यान भैरव क्रांती सेनेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यांचा परिचय करून देण्यात आला तसेच त्यांच्या समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित मान्यवर : प्रदेश उपाध्यक्ष ग...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच हवेली तालुक्‍यातील भटक्या-विमुक्त समाजाला मिळाले फिरते रेशनिंग कार्ड व इतर योजनांचा शासकीय लाभ

  भैरव क्रांती सेनेच्या पुढाकाराने हवेली तालुक्यात भव्य शिबिर – शेकडो नागरिकांना शासन योजनांचा लाभ पुणे प्रतिनिधी | हवेली तालुका : हवेली तहसीलदार कार्यालय आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त पुढाकारातून येवलेवाडी येथे भटक्या-विमुक्त जाती-जमातींसाठी एक भव्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच येवलेवाडीतील नागरिकांना फिरते रेशनिंग कार्ड देण्यात आले तसेच संजय गांधी निराधार योजना, विधवा योजना, अपंग योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात आला. या शिबिराचे आयोजन तहसीलदार किरण सुरवसे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरोटे, तसेच कोंढवा मंडळ अधिकारी संदीप शिंदे, कात्रज मंडळ अधिकारी साधना चव्हाण, श्री. संदिप शिंदे (मंडलअधिकारी कोंढवा) श्री.विकास खोटे (तलाठी),श्री.सुधीर गिरमे (तलाठी),श्री.केतन जाधव,(तलाठी),सुनंदा पाटील (मदतनीस) श्री.तानाजी भोई (मदतनीस),राजेंद्र मसुगडे(मदतनीस) अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी थेट शिबिरस्थळी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे, तसेच योजनांची नोंदणी तात्काळ पूर्ण केली. शिधापत्रिका वाटप, आधार कार्ड व मतदार ओ...

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव व प्रदेश कार्यकारिणी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

प्रतिनिधि:पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब यांच्यासमवेत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव आणि प्रदेश कार्यकारिणी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भटक्या-विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी झालेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेला सुरुवात होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेबांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य हेच दर्शवत होते की भटक्या-विमुक्त समाजाचे काम कायदेशीर आणि सकारात्मक मार्गाने पूर्णत्वास जात आहे. त्यांच्या भावनेतून समाधान आणि आनंद दोन्ही झळकत होते. जिल्हाधिकारी महोदयांनी मागील महिन्यांमध्ये जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या मागणीप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, अनेक भटक्या-विमुक्त समाजातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्टपणे सांगितले की पात्र असलेल्या एकाही नागरिकाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही. महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करून हे कार्य वेगाने राबविण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. या बैठकीत न...

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली

पुणे | प्रतिनिधी (फोटो : राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन, पुणे) भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श ठेवणारे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर न्यायालयात झालेला हल्ला हा अत्यंत निंदनीय आहे. शासन पुरस्कृत धर्मांध शक्तींना मिळालेली मोकळीक आता थेट न्यायपालिकेवर हल्ला करण्यापर्यंत पोहोचली आहे. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून भारताच्या संविधानावर आणि सामाजिक समतेवर झालेला हल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या आणि संविधानिक मूल्यांना कमकुवत करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया “हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संविधानावर, सामाजिक समतेवर आणि दल...

भटक्या-विमुक्त समाजाच्या हक्कासाठी भैरव क्रांती सेनेची धडपड उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा व संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

  उल्हासनगर प्रतिनिधी: भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या हेतूने भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा विजयानंद शर्मा आणि तहसीलदार सुरज सागर यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली पुणे शहर आणि जिल्ह्यात भटक्या विमुक्त समाजासाठी राबवण्यात आलेली जात दाखला मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता हीच मोहीम अंबरनाथ कल्याण उल्हासनगर परिसरात राबविण्याचा निर्धार भैरव क्रांती सेनेने केला आहे बैठकीदरम्यान भैरव क्रांती सेनेच्या प्रदेश समिती सह अकरा समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते समाजाच्या सातत्याने स्थलांतरामुळे त्यांच्याकडे वास्तव्याचे वा जात सिद्धतेचे पुरावे नसल्याने अनेक बांधव जात प्रमाणपत्रापासून वंचित राहिले आहेत अशी माहिती श्री जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली त्यांनी पुणे येथे राबवण्यात आलेल्या यशस्वी मोहिमेची संपूर्ण कायदेशीर कागदपत्रे सादर करून त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही मोहीम राबविण्याची मागणी केली जात प्रमाणपत्र प्रक्रियेत शासकीय अधिकारी स...

संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भैरव क्रांती सेनेच्या प्रदेश कार्यकारिणीवर नवीन १५ सदस्यांची नियुक्ती

  पुणे: भैरव क्रांती सेना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते प्रदेश कार्यकारिणीवर विविध समाजघटकांतील नवीन १५ सदस्यांची निवड करण्यात आली. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या या सर्व सदस्यांना पुढील काळात संघटनेच्या विविध उपक्रमांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. निवड झालेल्या नवीन प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची नावे: अक्षय शंकर शिंदे, दत्ता धोंडिराम शेगर, सागर दत्तात्रय पवार, प्रिया विक्रम पवार, रेखा विनायक काटे, कविता प्रशांत बागल, दीपक राजाराम कोष्टी, रमेश गणपत सावंत, अनिल हरिभाऊ चौगुले, अनिल राम लगस, धनंजय माळवे, शुभम प्रदीप पवार, धिरज अनिल जाधव, संजय गंगाधर पवार, सानवी संदीप शिंदे. विशेष म्हणजे, कार्यकारिणीत महिलांनाही योग्य स्थान देण्यात आले असून समाजातील महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेतून ठोस पावले उचलली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून फिरते रेशनिंग कार्ड, विधवा योजना, देवदासी योजना तसेच कलाकार योजना या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी येवलेवाडी भैरवन...

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भैरव क्रांती सेनेची महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर

  पुणे (कामठे पाटील नगर), दि. 28 सप्टेंबर – संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भैरव क्रांती सेनेची महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत गोरगरीब, शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी आणि कलाकार बांधवांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजहितासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करत, शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करत खालील सदस्यांची निवड करण्यात आली आहे:  शंकर जाधव - उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश संजय भोसले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश  गोविंदराव अटक - उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश दिपक कुमावत - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश दिनेश गवळी - सचिव महाराष्ट्र प्रदेश   दिपक पखाले - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश  मोहन निबांळकर - कलाकार समन्वयक महाराष्ट्र प्रदेश  गोपाल ओरसे - सल्लागार महाराष्ट्र प्रदेश  मोहन...

विजय जाधव यांचा पुढाकार आणि प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ-मुळशी तालुका भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जात प्रमाणपत्र अभियान यशस्वी

पुणे प्रतिनिधी – मावळ-मुळशीतील भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जात प्रमाणपत्र अभियान यशस्वीरीत्या पार पडले हे अभियान जय भैरवनाथ सामाजिक सहकारी संस्था चे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने आणि मा जिल्हाधिकारी पुणे मावळ-मुळशी चे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले अभियानाद्वारे मावळ-मुळशीतील शेकडो समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले गेले या कामात प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे, नायब तहसीलदार श्री ढमाले, नायब तहसीलदार श्रीमती दर्शना सूर्यवंशी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वार्ड ऑफिसर श्री ननवरे, गटविकास अधिकारी श्री पंडित, सर्व मंडल अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी सक्रिय सहभाग घेतला अभियानाचे आयोजन बावधन येथे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या दालनामध्ये करण्यात आले या बैठकीत वासुदेव समाज, वडार समाज, नाथपंथी, डवरी, गोसावी समाज यांचे बांधव उपस्थित होते तसेच युवक, युवती, महिला आणि जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला विशेष योगदान देणारे थेरगावचे मंडल अधिकारी विष्णू भोसले, मंडल अधिकारी श्रीमती अर्पण...

पुरंदर तालुक्यात जात प्रमाणपत्र मोहिमेचे यश – जय भैरवनाथ संस्था, अध्यक्ष विजय जाधव व प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली

सासवड (पुरंदर): जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यात भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या नागरिकांसाठी आयोजित जात दाखला मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मोहिमेचा मुख्य उद्देश गरजू नागरिकांना कायदेशीर जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाशी थेट संपर्क साधण्याची संधी प्रदान करणे हा होता. कार्यक्रमात कुमारी कल्याणी सावंत व कुमारी दिव्या सावंत यांना उपविभागीय अधिकारी व प्रांत अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे आणि तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यवाहीबद्दल प्रशासनानेही कौतुक व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी संस्थेच्या पुढाकाराचे कौतुक करत, भविष्यातील सामाजिक उपक्रमांसाठी बैठक घेण्याची घोषणा केली. कार्यक्रमात संस्थेचे सर्व समन्वयक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार वाघ मॅडम, मंडल अधिकारी जेजुरी बडदे, परिंचे बनसोडे, वाल्हे भिसे यांनीही सक्रिय योगदान दिले. यावेळी समाजातील मान्यवर नेते, जसे की दशरथ माळी...

भटक्या विमुक्त जाती-जमातींची महत्वपूर्ण बैठक कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या दालनात संपन्न

भटक्या विमुक्त जाती-जमातींची महत्वपूर्ण बैठक  पुणे प्रतिनिधी : कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या दालनामध्ये जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव तसेच ओबीसी समाजाचे माजी अध्यक्ष संजय टिळेकर यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जाती-जमातींची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व समाजाचे समन्वयक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार टिळेकर यांनी भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे कार्य व समाजकारणाचे कौतुक केले तसेच संस्थेच्या कार्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आमदार टिळेकर म्हणाले की, “आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी असणाऱ्या प्रलंबित योजना तातडीने मिळवून देण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असून मुख्यमंत्री व प्रशासनाच्या मार्फत योग्य त्या उपाययोजना करून न्याय मिळवून देणार आहे.” या बैठकीत भराडी समाजाचे नेते शंकर जाधव, चित्रकथी समाजाचे नेते संजय भोसले, बेलदार समाजाचे नेते दीपक कुमावत, लोहार समाजाचे नेते दीपक पखाले, मरीआई समाजाचे नेते मोहन निंबाळकर, विलास पवार, दगडू पवार, वासुदेव समाजाचे नेते गोविंदरा...

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध — बालगंधर्व रंगमंदिर चौकात तीव्र आंदोलन

  बालगंधर्व रंगमंदिर चौकातील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्व. राजारामबापू पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते जयंतराव पाटील यांचा केलेला अपमान संतापजनक असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केला. या निषेधार्थ पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही घोषणाबाजी करून धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात ॲड. निलेश निकम, किशोर कांबळे, डॉ. सुनील जगताप, डॉ. शशिकांत कदम, रोहन पायगुडे, स्वप्निल जोशी, केतन ओरसे, मनाली भिलारे, विद्या ताकवले, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, तानिया साळुंखे, रमिझ सय्यद, प्राजक्ता जाधव, दिलशाद अत्तार, शैलेंद्र बेल्हेकर, आसिफ शेख आदींसह शहरातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.